पावसाची गंमत..
पावसाची गंमत
ढगांच गडगडणं
पाखरांच फडफडणं
ढगांच्या आवाजाने
हृदयाचं धडधडणं
झाडावर घरटे
घरट्यात गवत
चमकणारी वीज
ताऱ्यांची सवत
मातीचा सुगंध
भिजलेली पाने
आभाळाच्या मुखातून
पावसाचे गाणे
शहारलेली माती
कोलमडलेली झाडे
धरणीच्या पाठीवर
गारांचे सडे
हिरवा शालू
धरणीला घालू
अनवाणी पायाने
त्यावर चालू
साऱ्यांचीच दैना
बोलता येईना
पावसाची ओंजळ
रीती होईना
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या