सोनेरी हृदयाचे सोनेरी व्यक्तिमत्त्व
*सोनेरी हृदयाचे सोनेरी व्यक्तिमत्त्व*
सोनेरी हृदयाचे जणू
असे हे सोनेरी व्यक्तिमत्त्व
पोलीस खात्यास मिळाले
सुरेख माणुसकीचे सत्व
साहेब म्हणजे आपलेपणा जपणारा
एक आपुलकीचा झरा
गर्व आणि अहंकाराचा
कुठेही ना लवलेश जरा
तळागळातील शिपायांची ही
अंतर्मनातून करतात कदर
म्हणूनच अश्या देवमाणसाचा
आमच्या हृदयात आहे आदर
आशीर्वाद असतो पाठीशी
अन पाठीवर कौतुकाची थाप
पोलीस महासंचालक म्हणजे
जणू पोलीस खात्याचे बाप
मन पर्वताएवढं मोठं आहे
काळीज समुद्रासारखं विशाल
भरकटणाऱ्यांना मार्ग दाखवणारी
साहेब म्हणजे पेटती मशाल
आम्हीही शोधत असतो अश्या
देवमाणसास भेटण्याचे बहाणे
परिसस्पर्श व्हावा आपला अन
या हि लोखंडाचे व्हावे सोने
कुठवर नखलून काढावेत साहेब
या मनातील इच्छेचे खपले
देवापेक्षा ही बहुतेक सर
दुर्मिळ झालयं दर्शन आपले
देवापेक्षा ही बहुतेक सर
दुर्मिळ झालयं दर्शन आपले
✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या