वृद्धाश्रम




वृद्धाश्रम

आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी
उपसले कष्ट परिश्रम
उर का दडपत नाही त्यांना
दाखवताना वृद्धाश्रम 

आपल्याच पोटचा गोळा तो
सुरेख आकार देऊन घडवला
बळ येताच पंखात जीर्ण देह 
का वृद्धाश्रमात सडवला

आपलाही प्रवास आहे 
त्याच खडतर वाटेवरून
पुन्हा साद द्या त्यांना 
या हृदयाच्या लाटेवरून 

आयुष्यभर झिजलेल्या देहास
एका क्षणात जातो तडा
अश्रूंच सिंचन त्यावर 
दुःखाचा विरक्त सडा

ज्यांनी जीव लावला तुम्हास
त्यांनाच आहे तुमचा लळा
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर 
हास्याचा फुलूवा मळा

लटपटणाऱ्या पावलांना त्यांच्या
दाखवा आशेचा किरण
आपलं म्हणून स्वीकारा पुन्हा
चुकलंय का कुणाला मरण....

✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Nice 👌👌👍
Unknown म्हणाले…
खूप सुंदर 👌👌👌
Unknown म्हणाले…
खूपच छान,,💐💐💐

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत