व्यथा बावऱ्या मनाची



*व्यथा बावऱ्या मनाची*

ही प्रीत नाही खोटी
हा प्राण आला कंठी
सैल रे मिलनाची मिठी
ना अन्य काही ओठी

तुझी प्रीत ती खरी
माझ्या जपते रे उरी
आता जिंदगी ती कोरी
येशील कधी रे घरी

तुला मनी रे स्मरती
तू पुन्हा यावा परती
माझा जीव तुझ्या वरती
नाही लादणार शर्ती

ना देणार त्रास पुन्हा
घडला काय रे माझा गुन्हा
दे अन्य कोणतीही सजा
तुझ्यावीण ना जीवनी मजा

माझ्या प्रीत पाखरा
का तू उडुनी गेला
मला सोडुनी गेला
प्रेम पाश सारे तू
असा तोडूनी गेला

✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूप सुंदर भावजी खरच तुम्हची कविता वाचली की असे वाटते की आपले मन च बोलतंय की काय? खूप छान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत