चिमणा संसार
चिमणा संसार
चिमणा चिमणीचा
चिमणा संसार
गोजिरवाणी त्यांची
पिले होती चार
चारही पिले त्यांना
जिवाहूनही प्यारी
त्यांच्याच भविष्याची
चिंता त्यांच्या उरी
सुंदर घरटं बनवलं त्यांनी
काडी काडी जमवून
पिलांना मोठं केलं
चोचीत घास भरवून
पिले जसजशी
होत गेली मोठी
जणू जन्मलीच ती
होती दुसऱ्यासाठी
जसजसं पंखात
बळ येत गेलं
एक एक पिल्लू
घरटं सोडत गेलं
पिलांचे संसार फुलले
त्यांनाही पिले झाली
डबडबणाऱ्या डोळ्यात
अश्रूंची फुले झाली
संसार पिलांचे फुलवून
आईची झाली आजी
आता आयुष्यभर वाहतील ते
एकलेपणाचीच ओझी
आता विरहात जळणारी
घरट्यामध्ये दोघचं
हर एक आठवनीगणिक
अश्रुंचे ओघचं
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या