धुंदी



*धुंदी*

बस झालं आता
खूप केलं अति
काही मोहाच्या क्षणांसाठी
विसरलो मायेची नाती

पोखरत गेलो डोंगर 
हाती काही आलं नाही
चेहऱ्यावर हावभाव असा
जस काही झालचं नाही

अशी कोणती होती धुंदी
पावले आपोआपच वळायची
माहीत असूनही सारं शेपटी
आपली आपणच जाळायची

कित्येकदा घेतली मी शपथ
पाणी त्यावर सोडले
तुझ्या मनाच्या मोठेपणाचे दर्शन
मला वेळोवेळी घडले

खरचं डोळ्यावरची आता
उतरली सारी धुंदी
शेवटचच माफ कर मला
अखेरची दे एक संधी

जोपर्यंत माझा आता
चालू असेल श्वास
तोपर्यंत त्याचा मी आता
ना धरणार पुन्हा ध्यास
✍✍✍✍✍
शब्दरचना 
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत