सावंतवाडी



*सावंतवाडी*

डोंगराच्या कुशीत 
हिरवीगार झाडी
किती मोहक दिसते
ही सावंतवाडी

नगरपालिकेच्या घड्याळात
केवढाले काटे
स्वप्नाहून सुंदर 
राजवाडा वाटे

तलावाच्या किनाऱ्याने
दिव्यांची रांग
मन भुलतेच ना तिथे
अक्षरशः सांग

सायंकाळी जणू 
सोनकळी भासते
प्रत्येकाला ओढ
 तिथलीच असते

रस्त्यामध्ये लागतो
सुंदर आंबोली घाट
पाहताना निसर्गसौंदर्य
भिजतो डोळ्याचा काठ

मन लुभावतात आकर्षक
कोरीव लाकडी खेळणी
जणू निसर्गाने दिलेली
कलेची वरओवाळणी

तिथल्या भाषेत आहे
फणसाची गोडी
तळलेल्या माश्यासोबत खावी
कोकमची कडी

✍✍✍✍✍✍
शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत