व्यसन दारूचे.......
*व्यसन दारूचे*
हजारो संसार उध्वस्त होतात
या दारूच्या व्यसनापाई
तरीही सांगा लोकांची का
ही दारू सुटता सुटत नाही
आम्ही आमच्या पैशाची पितो
म्हणे कुणाच्या बापाची नाही
काळजी का तुम्हास मग त्या
चिमुकल्या रोपाची नाही
डोळे झाकून दारूचा घोट
रिचवला जातो घश्याआड
घाबरत घाबरत छोटीशी परी
लपते आईच्या पदराआड
दारू पिल्यावर म्हणे आमची
दुःखे सारी हलकी होतात
स्वतःच्या शरीराची नासाडी
ते स्वतःच अशी करून घेतात
डोळ्यासमोर पाहतो माझ्या
रोज अशी जिवंत उदाहरणे
का कळत नाहीत हो त्यांना
दारूच्या विनाशाची कारणे
थांगपत्ता ही लागत नाही
या अनावश्यक गरजांचा
दारूच्या व्यसनापाईच मग
तो डोंगर होतो कर्जाचा
हुंदका गिळून सहन करते ती
रोजच्या त्याच्या त्रासाला
अश्रूंच्या धारा विचारतात तिच्या
अहो असलं व्यसन कशाला
दुर्दशा स्वतःच्या संसाराची
उघड्या डोळ्यांनी बघवत नाही
आतून खंगत असते बिचारी
मात्र बोलवंत काहीच नाही
लिव्हर खराब होतो त्याचा
ती किडनीही होत असते बाद
दुष्परिणाम पाहून तरी निदान
तो दारूचा सुटावा ना नाद
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या