मानवता



*मानवता*

बंद झालीत मंदिरे सारी 
तरी उघडत नाहीत डोळे
इतके कसे काय हो सांगा
लोकं मनातून देवभोळे

सगळं दिसतंय डोळ्यांनी 
पण करायचं नाही मान्य
माणूसच झटतोय माणसासाठी
नाही कोणी अन्य

आनंदासाठी म्हणे तुम्ही
करता देवाचा धावा
मग संकटकाळीच सांगा तो
जातो कोणत्या गावा

ते करतील जीवाचं रान
आणि झटतील दिवस रात्र
सगळं श्रेय जाईल देवाला
आणि मानव राहील नाममात्र

खरच सांगतो मित्रांनो मी
दगडास मानत नाही देव
माणसाने माणूस जपा
हीच आयुष्यभराची ठेव
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत