बळीराजा........


 

*बळीराजा*

निसर्गाशी दोन हात
तोच करतो फक्त
मातीत झिरपवुन
घामासोबत रक्त

निसर्ग कोपला की 
त्यालाच लागते भोगावे
दारिद्र्यात खितपत
आयुष्य कुठंवर जगावे

दिवसरात्र कष्ट करून
एक एक दाणा पिकतो
डोळ्यातील आसवांच्या
इथे व्यथा कोण ऐकतो

हाता तोंडाशी आलेल्या घासाची
पुन्हा पुन्हा होते माती
तुम्हीच सांगा या बळीराजाने 
अजून सोसावे तरी किती

पुराच्या पाण्यासोबत
सगळे वाहून जाते पीक
कुणाकडे पसरावा पदर अन
मागावी भरपाईची भीक

✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233

टिप्पण्या

Digambar s pune म्हणाले…
शेतकर्यांची व्यथा खुपच छान मांडली
Sampat Murkute म्हणाले…
खुपच सुंदर रचना आहे
अनामित म्हणाले…
हृदयस्पर्शी...👌👌👌
Bhatu More म्हणाले…
अतिशय सुंदर
🙏🙏🙏👌👌👍👍
अनामित म्हणाले…
लय भारी
विकास खुटवड म्हणाले…
लय भारी
Chandu sayam म्हणाले…
खूप छान सर सुंदर
गोकुळ म्हणाले…
अप्रतिम

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत