तिळगुळ घेऊन जर खरंच...
*तिळगुळ घेऊन जर खरंच...*
जी माणसे गोडच आहेत
त्यांना गरज काय तिळगुळाची
माणसाला माणूसपण द्या
ही गरज आहे काळाची
आपल्याशी न बोलणाऱ्यांना
आपण देतो का तिळगुळ
का संपवत नाही मनातून
आपण द्वेष मत्सर समूळ
भाऊ भावाचा वैरी अशी
कित्येक घरात ख्याती
खरचं तिळगुळ देऊन
ही सुधारतील का नाती
तिळगुळ घ्या गोड बोला
ऐकायला वाटतं बरं
अंतर्मनातून एकदा सांगा
लोकं तसं वागतात का खरं
तिळगुळ घेऊन जर खरंच
गोड बोलत असती माणसं
आपुलकीविना सुकली नसती
कधीच मनामनाची कणसं
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या