कर्ज म्हटलं की.....

 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक "कविकट्टा" या कार्यक्रमासाठी माझी स्वरचित कविता       पाठवत आहे .


अजय दत्तात्रय चव्हाण
36/ए/रूम नंबर 11 ब्रम्हपुत्रा बिल्डिंग.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 8 
जयकोच कंपनी जवळ,
पश्चिम द्रुगती मार्ग गोरेगांव (पूर्व)
पिनकोड :- 400065
ई-मेल ajay2507chavan@gmail.com
Whatsapp नंबर :- 8424043233


कर्ज म्हटलं की...

कर्ज म्हटलं की
अंगावर येतो काटा
रक्ताळलेल्या अश्रूंच्या
कोसोदूर वाटा

राबराब राबलं तरी
मनासारखं पिकत नाही
कर्जाच पारडं इतकं जड
काही केल्या झुकत नाही

कधी कडक दुष्काळ तर
कधी पाऊस होतो जास्त
जगणं होत महाग
मरण मात्र स्वस्त

कर्ज असलं की माणूस
होऊन जातो लाचार
दुःख भरल्या मनाचा
करतो कोण विचार

कर्ज डोक्यावर म्हटलं की
लागत नाही झोप
उमेद संपते जगण्याची
 अन गळ्याभोवती रोप
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत