Deshmukh sir Ptc Marol
*आमच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ,मुंबई चे वरिष्ठ श्रेणी लिपिक श्री गणेश देशमुख सर यांनी कवीला कवीच्या भाषेत दिलेले उत्तर नक्किच आपणास मंत्रमुग्ध करून जाईल सरांनी नूतनचारोळीसंग्रहातील प्रत्येक सदर आणि सदर त्यांच्या लेखणीतून इतक्या सुरेखपणे फुलविले आहे की वाचणाऱ्याचे मन प्रफुल्लित होऊन जाईल...👍*
*खाकी वर्दीतील दर्दी कवींच्या चारोळी संग्रहाला प्रतिक्रिया चारोळीच्या माध्यमातून*_
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1️⃣
सुरुवात होते आपली,
*शहिदांना मानवंदनेपासून* ...
देशभक्ती जागी होते,
मन गाभाऱ्याच्या आतून...
2️⃣
उडवतात कल्पनांचे घोडे,
*चिरतरुण चारोळ्या* ...
भावतात कोणत्याही वयाच्या मनाला,
उडालेल्या तरुणपणाच्या पाकोळ्या...
3️⃣
*प्रेमाच्या* विश्वात शिरताना,
आनंद खूप होतो...
*कोसळणाऱ्या पावसाचं* वाचताना मात्र,
मध्येच खूप त्रास होतो...
4️⃣
प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो,
कधी ना कधी *विरह* ...
वाचत असताना हा भाग,
समजतच नाही कधी होतो कलह...
5️⃣
कठीण असतात आयुष्यातील,
बरेच सारे प्रसंग...
त्यातून सावरण्यासाठी नक्कीच,
उपयोगाचा ठरेल *प्रेरणादायी चारोळ्यांचा* संग...
6️⃣
कसा खेळ चालू मानवाचा,
संबंधित या कोरोना विषाणूशी...
हे दाखवून प्रत्येकाला,
शिकवले *लढा छुप्या शत्रूशी* ...
7️⃣
गणपती नवरात्री दसरा,
चित्र रंगवले शिवजन्माचे...
उधळले तनामनाच्या कोपऱ्यात,
*रंग सण उत्सवाचे* ...
8️⃣
खाकी वर्दीतल्या पोलिसांचे,
आयुष्य कसे असते नोकरी करताना...
दाखवून दिले सर्वाना,
*गणपती स्पेशल* सजवताना...
9️⃣
नऊ रंगांची उधळण करण्यासाठी,
*नवरात्र स्पेशल* आणली...
वर्णन उतरवले खरे त्यात,
यामध्ये खाकी कशी ताणली...
🔟
*दिवाळी स्पेशलच्या* निमित्ताने,
समजते खदखद मनाची...
सणवार आम्हा नाही,
खंत आहे पोलिसांची...
1️⃣1️⃣
समाजात या आपल्या,
स्थिती आहे कशी स्रियांची...
सांगून जाते वास्तव,
*खदखद स्त्री मनाची* ...
1️⃣2️⃣
लोक दिसतात १ करतात १,
करेल का कोणी पोल खोल...
समजून घ्यायचे असेल हे,
तर वाचावे कवीचे *अनुभवाचे बोल* ...
1️⃣3️⃣
खयाल दिल याद अरमान,
कसम गम और तडपना...
ऐसे शब्दोसे खुलता है
*शायराना अंदाज* कवी का...
1️⃣4️⃣
अवघड असलेलं लगेच सुटतं,
कवींच्या भविष्याचं कोडं...
त्यासाठी वाचावं लागतं,
*दर्दी कवींच्या मनातलं थोडं* ...
1️⃣5️⃣ पोलिसांची व्यथा पुन्हा एकदा मांडली,
मनात त्याच्या झाकून...
शब्द रूपाने बाहेर आली,
वेदना *वर्दीच्या आतून* ...
1️⃣6️⃣
लिहिल्या असतील चारोळ्या त्यांनी अनेक,
कल्पना व भावनांच्या मनातून...
त्यापैकी खास घेऊन आले आहेत ते,
*टॉप २०* च्या माध्यमातून...
1️⃣7️⃣
सोडायचं काहीच नाही महत्वाचं,
जे रसिकांपर्यंत पोहोचवायचं...
त्यासाठी *उरलं सुरलं* जोडलं,
कारण एकच - रसिकांना मंत्रमुग्ध करायचं...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*म्हणतात ना जेथे ना पोहोचे रवी तेथे पोहोचे कवी...*
_खरंच... आपल्या दर्दी कवीचे मन कुठेही फिरते, ते स्वच्छंदी आहे, त्याला बंध नाहीत, भावविश्व, विचारविश्व, कल्पनाविश्व हे त्यांच्याकडे खुप मोठे - अपार - विशाल आहे... याची प्रचिती हा चारोळी संग्रह वाचताना आली..._
_*आमचे स्नेही कविराज श्री अजय चव्हाण यांना भविष्यासाठी खुप खूप शुभेच्छा... उत्तरोत्तर त्यांची प्रगती बहरत जावो ही प्रार्थना...*_
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*गणेश देशमुख*
टिप्पण्या