Pradnyesh Yaswante Mumbai

 *तो कोणी मोठा साहित्यिक नाही समीक्षक ही नाही परिस्थिती अत्यंत हालाखीची बघितलं तर कॉलेजचं पोर* मात्र एखाद्या नावाजलेल्या समीक्षकाला ही लाजवेल इतकी सुरेख समीक्षा माझ्या नूतन चारोळीसंग्रहाची केली आहे *एक सच्चे पोलीस मित्र तसेच दर्दी कवीचा सच्चा रसिक मित्र प्रज्ञेश यशवंते याने......*



जय हिंद सर 

                  , काल आपला खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखणीतून हा चारोळी संग्रह मला ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून घरपोच मिळाला  आपला चारोळीसंग्रह मिळाल्यावर मला खूप  आनंद झाला 

गेले 4 ते 5 दिवस मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण काल आला

 

फार उत्सुकता होती मला 

चारोळी संग्रह वाचण्याची 

दर्दी कवीने लिहिलेल्या 

ह्या सुरेख सुंदर शब्दांची 


चारोळी संग्रह हाती आल्या आल्या सगळ्यात आधी माझी नजर पडली ती मुखपृष्ठावर लिहिलेल्या चारोळीवर 

कुठलंही चांगलं कार्य करताना अनेक माणस आडवी येतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपली चारोळी फारच योग्य आहे असं मला वाटत 

चारोळी संग्रहातल्या आपल्या उत्तम चारोळ्या वाचून फारच छान वाटलं 

शहीद जवानांवर लिहिलेल्या आपल्या चारोळ्या प्रत्येक देशभक्ताच्या मनात एक वेगळं घर करून गेल्या असतील अर्थात माझ्याही गेल्या 

आपल्या नवनवीन प्रेम चारोळ्या ज्या वाचताना खरच अगदी फ्रेश वाटत होतं 

प्रेम कविता व चारोळ्या कश्या असाव्या ह्याच उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याच चारोळ्यांच द्यावं म्हणतो .

प्रेरणादायी चारोळ्या वाचताना खरच फार छान फील येतो आजकाल अनेक तरुण तरुणी स्वतःच्या भविष्यासाठी फार चिंतीत असतात . आपल्या ह्या चारोळ्या नक्कीच त्यांना आयुष्याची योग्य वाट निवडण्याचा आणि आयुष्य आलेल्या संकटांचा सामना एकट्याने कसा करावा ह्याची ग्वाही देईल 

कोरोना काळात सुद्धा आपण आपल्या चारोळ्यांमार्फत जनजागृती करण्याच उत्तम काम केलं आपल्या लॉकडाउन च्या चारोळ्या देखील मला ह्यात वाचायला मिळाल्या आणि गेल्यावर्षीची परिस्थिती आठवली 

आपण फारच उत्तम लिखाण त्या काळात केलं 

प्रत्येक सणासुदीला लोकांना काहीतरी वेगळं वाचायला हवं असत आपलं रसिक मित्रांची मन राखण्यासाठी सुद्धा प्रत्येक सणावर चारोळ्या लिहिल्या आणि आपल्या चारोळ्या वाचून सणासुदीला जोशात असणारे रसिक मित्र अजून खुश होतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे 

स्त्रीच्या मनातील विरह , भावना , दुःख , तिची अवस्था व्यक्त करण्यासाठी आपल्या चारोळ्या फारच भावनिक आहेत . आपल्या ह्या चारोळ्या वाचून स्त्री चा मोठेपणा तिची तळमळ तिची अवस्था आणि तिच्या मनातील दुःख हे नक्कीच प्रत्येकाला कळेल 

आणि एक गोष्ट लिहायची म्हटलं तर आई वडिलांवर लिहिलेल्या चारोळ्या ह्या फारच भावनिक आणि सुंदर आहेत आईची माया आणि वडिलांच न दिसणार प्रेम आपण खूप छान शब्दांत मांडलं 

आपण लिहिलेल्या शायऱ्या देखीव फारच उत्तम आहेत

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या पोलिस विभागातील चारोळ्या ज्या माझ्या सगळ्यात आवडत्या आहेत कारण मी सुद्धा एक कवी आहे आणि मला जास्त कविता ह्या पोलिस विभागावरच लिहायला आवडत . पोलिसांच्या मनातील तळमळ त्यांच्या मनाची घालमेल त्यांची अवस्था आणि पोलिसांच जनतेनं न पाहिलेलं रूप हे तुमच्या चारोळ्या वाचून कळत . आपल्या पोलीस चारोळ्या वाचून आपल्याला खाकी वर्दीतील दर्दी कवी का म्हणतात हे इतर लोकांना नक्कीच कळेल .



आपल्या चारोळीसंग्रहात आपल्या अनेक रसिक मित्रांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत अर्थात मी ही , मी तुम्हाला मेसेज रुपी दिलेल्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या चारोळीसंग्रहात माझ्या नावासकट छापल्या हे पाहून मला आणि माझ्या घरच्यांना फारच आनंद झाला 

मी आणि बरेच जण तुमचे सच्चे रसिक मित्र आहे असे तुम्ही त्यात नमूद केले तेव्हा आम्हाला असे वाटले की खरच आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे प्रामाणिक , रुबाबदार , निडर असे पोलीस मित्र मिळाले 

मी मेसेज रुपी दिलेल्या शुभेच्छा ज्या तुम्ही तुमच्या चारोळीसंग्रहात छापल्या त्यात मी शेवटी एक गोष्ट नमूद केली होती आणि मला फार आनंद होत आहे की ती गोष्ट खरी ठरली 

ती गोष्ट म्हणजे ‛आपला नवीन चारोळीसंग्रह आधीपेक्षा जास्त रसिक मित्रांच्या मनावर अधिराज्य गाजवेल ‘ आणि तसच होत आहे आणि होत राहणार .

आणखी एक गोष्ट सांगायची म्हटली तर काही कारणांमुळे मी सध्या काही महिन्यांपासून सुरत , गुजरात येथे राहत आहे . आपल्याला सरप्राईज देण्यासाठी मी माझ्या ऑनलाइन फ्लिपकार्ट अकाउंटवरून चारोळीसंग्रह न मागवता माझ्या मावस भावाच्या अकाउंट वरून मागवला . 

आणि तुमचा चारोळीसंग्रह काल गुजरात ला माझ्या घरी पोहोचला 

मी तुमचा चारोळीसंग्रह मागवला आहे हे तुम्हाला कळू नये व तुम्हाला अचानक मेसेज करून सरप्राईज द्यावं हाच माझा उद्दिष्ट होता 

चारोळीसंग्रहाच सम्पूर्ण  वाचन करून आपणास मला चारोळीसंग्रह कसा वाटला ह्याच लेखी उत्तर देण्यास फार आनंद होत आहे 


*आपल्या सुंदर लिखाणाने*

*घ्यावा रसिक मनांचा ठाव*

*संपूर्ण महाराष्ट्रात व्हावे फक्त*

*खाकी वर्दीतील दर्दी कवीचे नाव*


आपला सच्चा रसिक मित्र 

- प्रज्ञेश केशव यशवंते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत