पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पूर

इमेज
 *पूर* आला पूर दडपला उर जगण्याचे सूर विस्कटले सारे घरात पाणी  लडबडली वाणी आर्थिक हानी होऊ लागली नद्या दुथडी पाण्याखाली पूल संध्याकाळची चूल पेटवावी कशी संकट कसले पीक नासले आयुष्य फसले विळख्यात पुराच्या पावसाचा जोर जीवाला घोर संकटांचा दोर कापावा कसा ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

गुरुपौर्णिमा

इमेज
  * गुरू * आशेची पहाट गुरूविन वाट संकटाची लाट थोपविन कोण गुरू असे माता कधी गुरू पिता तोच सर्व दाता जाता शरण ज्ञानाचा सागर बुद्धीचा जागर प्रेमाची घागर गुरू असे दिसे गुरू चरण सोपे होई मरण अंतर्मनास स्फुरण चढे आपोआप गुरूचा आदर्श ध्येयास स्पर्श मनोमन हर्ष होई तया ✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

*माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐*

इमेज
 

Smita Baikar Navi mumbai

इमेज
  *अखेर आपला नुतन चारोळी संग्रह मिळाला..*  *तुमचे खुप खूप आभार सर..*  ऍमेझॉन ची डिलिव्हरी कॅन्सल झाली हे तुम्हाला सांगितल्यावर लगेच  पोस्ट ने माझ्यापर्यंत आपला संग्रह पाठविण्याची व्यवस्था केलीत..  माझ्यासारख्या छोट्यातल्या छोट्या रसिक मित्रांसाठी सुद्धा इतक्या मनःपूर्वक काम करणारा कवी मी पहिल्यांद्याच पाहिला.. *आपला चारोळीसंग्रह खूपच अप्रतिम आहे..*  *एक एक चारोळी मध्ये तुम्ही अक्षरशः तुमचा जीव ओतून लिहिले आहे..* अश्याच चारोळ्या रोज आम्हांला वाचायला मिळोत आणि तुमचे सगळे संग्रह एक दिवस प्रेत्येकाच्या  घरात असतील हा माझा विश्वास आहे...  पुन्हा एकदा मनापासून आभार...  🙏🙏       *....स्मिता बैकर ,नवी मुंबई*

Sarika nawale nashik

इमेज
* परिस्थिती कितीही गरीब असली * * हालाखीची असली तरी * खूप मोठ्या मनाचे सच्चा व निस्वार्थी मनाने साथ देणारे रसिक मित्र मला पावलोपावली भेटत गेले... * एका गरीब शेतकरी कुटूंबातील मुलगी असूनही आवडीने तिने माझा चारोळीसंग्रह मागवून घेतला * आणि तो तिला अगदी मनापासून आवडला सुद्धा... * तिच्या शब्दात तिने दिलेली सुंदर अशी प्रतिक्रिया.... * * तुम्ही खूप मस्त चारोळ्या लिहल्या आहेत मला खूप आवडल्या * तुम्ही आनुष्का साठी लिहिलं आहे ते खूप आवडलं मला आतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही शब्दांची रचना केली आहे. मला खूप आवडलं मी तुमचा चारोळी संग्रह वाचला तेव्हा i fell so happy😇 मला खूप म्हणजे खूप खूपच आवडला सर सांगायला गेलं तर शब्द पण कमी पडतील * एखाद्याला जर वाचनाची आवड नसेल आणि त्याने जर चारोळी सांग्रह वाचला तर त्याला ही नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल खूप मस्त आहे..👍 * ❤️🥰🥰🥰🤗🤗🤗😊           * .....सारिका नवले *                  * इगतपुरी, नाशिक *