गुरुपौर्णिमा
*गुरू*
आशेची पहाट
गुरूविन वाट
संकटाची लाट
थोपविन कोण
गुरू असे माता
कधी गुरू पिता
तोच सर्व दाता
जाता शरण
ज्ञानाचा सागर
बुद्धीचा जागर
प्रेमाची घागर
गुरू असे
दिसे गुरू चरण
सोपे होई मरण
अंतर्मनास स्फुरण
चढे आपोआप
गुरूचा आदर्श
ध्येयास स्पर्श
मनोमन हर्ष
होई तया
✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या