महापूर
सांगली ,कोल्हापूर पुरस्थितीवर लिहलेली ही खाकी वर्दीतील दर्दी कवीची सुरेख रचना......
*आवडल्यास शेयर करायला मात्र विसरू नका....*
*माणुसकी*
जरी झाले जलमय सारे
सांगली अन कोल्हापूर
इथेच गवसला खरा सर्वांना
माणुसकीचा तो मधुर सूर
महापुराचे पाणी जसजसे
चढू लागले अंगण दारी
प्राणाचीही पर्वा न करता
धावून आले ते वर्दीधारी
जिवात जीव आला त्यांच्या
अश्रूंचाही मग फुटला बांध
आपआपसात द्वेष कशाला
ही माणुसकीच जरा सांध
कंठात प्राण आणून सर्वजण
बसले होते ती आस लावून
माणसेच माणसांच्या मदतीला
अश्या पुरस्थितीत आली धावून
माणसाने माणूस जपा तुम्ही
हीच तर खरी आपली संपत्ती
तेच करतील रक्षण प्राणांचे
कसलीही असो नैसर्गिक आपत्ती
माणुसकीचे घडले दर्शन
विसरून सर्व धर्म -जात
अश्रू पुसण्या त्यांचे आता
पहा सरसावले सारे हात
देव ,धर्म अन जात- पात
यात राहू नका अडकून
माणसेच येतील मदतीला
हेच सांगणे माझे कडकडून
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या