दहीहंडी
#यंदाची_दहीहंडी*
फोडली असती हंडी आम्ही
चढवून थरावर थर
भारतात कोरोना हा
आलाच नसता तर
बालगोपाळांची फ़ौज घेऊन
गल्लोगल्ली फिरलो असतो
फोडुन मनाची दहीहंडी
विजयी ही ठरलो असतो
कोसळणाऱ्या पावसात
झालो असतो ओलेचिंब
गोंडस लेकरात पाहिले असते
नंदलालाचे प्रतिबिंब
ढोल ताशांच्या गजरात
दुमदुमले असते आकाश
डोळ्यासमोर चित्र फक्त
मन मात्र आतून भकास
एकजुटीने सगळे मिळून
करू कोरोना वर सरशी
यंदाची कसर सारी आपण
भरून काढू पुढच्या वर्षी
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या