वडापाव दिन
#जागतिक_वडापाव_दिवस
खमंग सुवास जणू
भुरळ घालायचा मनाला
खरं खरं सांगा वडा पाव
आवडायचा कोणाला
वडिलांनी दिलेले पैसे
ठेवायचो आम्ही जपून
भूक लागली की वडापाव
मग हळूच खायचो लपून
वडापावचा स्वाद दिवसभर
रेंगाळायचा जिभेवर
बहिष्कार टाकावा तरी कसा
सांगा मित्रांच्या सभेवर
गरमागरम वडापाव सोबत
मिरच्या हव्यातच तळलेल्या
आठवतात पुन्हा पुन्हा त्या
मैत्रीच्या गाठी जुळलेल्या
एकटा एकटाच हातात
असतो वडापाव धरून
कॉलेजचे ते दिवस पुन्हा
सांगा येतील का फिरून
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या