अजिंक्य राऊत
*खटाव गावचे सुपुत्र शहीद जवान अजिंक्य राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐*
*वीरमरण*
वीरमरण आले त्यांना
बजावताना देशसेवा
असा पुत्र प्रत्येक मातेच्या
पोटी जन्मा यावा
धन्य झाली तिची कुस
डोळ्यात टिपूस ही नसेल
देशाच्या कामी आला पुत्र
चेहऱ्यावर अभिमान दिसेल
देशसेवेसाठीच झिजवली
त्याने आयुष्यभर काया
शूरवीरांची भूमी ती
बलिदान जाईल कसे वाया
तिच्या कुंकवाचे जरी
पुसले गेले सूर्यबिंब
लेकराच्या डोळ्यात पाहीन
ती त्याचेच प्रतिबिंब
नाव त्याचे अजिंक्य
तो अजिंक्यच राहील हृदयात
लाखो सूर्य मावळतात
एका शूरविराच्या उदयात
तिच्या पोटात वाढतोय
अंश त्याच्याच रक्ताचा
अभिमान बाळगतो आम्ही
नेहमी शहीद या तख्ताचा
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या