ऑनलाईन प्रेम


 

#ऑनलाईन_प्रेम

संध्याकाळचा सूर्य जेव्हा
ढगाआड जायचा कलून
ऑनलाईन प्रेम त्यांचं
यायचं हळूच फुलून

चॅटिंग वर चॅटिंग आणि
कटिंग वर कटिंग असायची
तो ऑनलाईन दिसला की
ती हळूच गालात हसायची

प्रेमाचं धुणं  ते दोघे
बसायचे रात रात धुत
आणा भाका शपथांना तर
नुसता यायचा उत

रिचार्ज तिचा मारता मारता
त्याच्या नाकी यायचे नऊ
नको करूस काळजी तू
आपण एकमेकांचे होऊ

सोना बाबू पिल्लू अजून
काय काय असायची विशेषणे
प्रत्यक्षात न भेटता ही त्यांची
एकेमकांत गुंतायची मने

मनाशी त्याने घट्ट ठरविले
तिला हृदयात करायचं लॉक
एक दिवस मात्र तिनेच 
त्याला करून टाकले ब्लॉक

ऑनलाईन प्रेमाचे शेवटी
असेच वाजतात तीन तेरा
दुसऱ्यासोबतच मारला तिने
तिच्या सातजन्माचा फेरा
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत