शहीद जवान सोमनाथ मांढरे
*साताराः*
वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र
सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे
देशसेवा बजावताना वीरमरण आले.
त्यांच्या पवित्र स्मृतींना खाकी वर्दीतील
दर्दी कवीची ही शब्दरूपी श्रद्धांजली....
💐💐💐💐💐💐💐
*शहीद जवान सोमनाथ मांढरे*
दुःखात अखंड बुडाले काल
छोटेसे गाव सगळे आसले
देशासाठी शहीद झाले ते
अजून मरण हवे तरी कसले
त्यांच्या जाण्याने हळहळले
संपूर्ण सातारा अन वाई
धूमसून धुमसून रडत असेल
त्या गोंडस लेकरांची आई
एका क्षणात होऊन गेले
कपाळ तिचे पांढरे
अनंतात विलीन झाले
जवान सोमनाथ मांढरे
मुलगा आठ वर्षांचा अन
मुलगी आहे दहा महिन्याची
कोणावरच येऊ नये वेळ अशी
हे असे दुःख भोगण्याची
देशासाठी बलिदान यासारखे
दुसरे कार्यच नाही मोठे
अश्रूंच्या धारांचा सांगा
हिशोब ठेवावा तरी कुठे
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233
टिप्पण्या