माझे पप्पा...
*माझे पप्पा*
तुमची आठवण पप्पा
इथे प्रत्येक क्षणी आहे
जरी वर्दी माझ्या अंगावर
तुमची उणीव मनी आहे
दोन्ही बहिणीवर आमच्या
तुमचा खूप होता जीव
ओलांडली कशी अचानक
मृत्यूने त्याची शिव
दुःखात बुडून गेली अचानक
ही दुनिया खेळती हसती
कोरोनाची इतकी का
बाबा घेतली तुम्ही धास्ती
परिपूर्ण परिवार आता
कसा अपूर्ण अपूर्ण वाटतो
तुमच्या आठवणीने पप्पा
चटकन डोळ्यात अश्रू दाटतो
उदास उदास असते
तुमची लाडकी परी
पप्पा या ना पुन्हा परत
फिरून आपल्या घरी
✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या