गझल




*कळपात राहून कळपासारखं..*


कळपात राहून कळपासारखं

वागणं कधी जमलं नाही


त्यांनी काढलं वेड्यात हरहमेशा

अंतरीचं दुःख अजून शमलं नाही


कुठंवर द्यायचा दोष स्वतःलाच

खोट्यापुढे शीर कधी नमलं नाही


अपमानाचे पचवून डोस

हृदय मात्र अजून दमलं नाही


एकटेपणा वाटला आपलासा

त्यांच्यात मन कधी रमलं नाही


शब्दांनीच केलं हे आयुष्य सुरेख

त्यांच्याविना चित्त कुठं गमलं नाही

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत