*बरेच दिवस झालं नवीन काही लिहले नव्हतं* 

आहे त्यातूनच इकडून तिकडून शोधून पाठवत होतो

आज मात्र सहज बसल्या बसल्या 

सुचली ही कविता

नक्कीच आवडेल आपणास...👍


*सहजच सुचलं*


वाचाव्यात माझ्या कविता

असं ही काही नाही

प्रत्येकच चारोळी आवडेल

तसं ही काही नाही


चारोळी वाचून माझी

फक्त आनंद मिळावा मनाला

चुकीचं कधीच मी 

पाठवत नाही कोणाला


माझ्यात काय कला आहे

हे तुम्हास ही कळेल

साथ तुमची असेल तर

मलाही स्फूर्ती मिळेल


पाठवत असतो आवडीने

अगदी रोज न चुकता

नसेल काहीच पटत तर

ब्लॉक ही करू शकता


खरंतर ब्लॉक हा पर्याय 

असूच शकत नाही

दर्दी कवीच्या पंगतीला

 कोणी बसूच शकत नाही

✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत