उंच भरारी
*उंच भरारी*
नऊ महिन्यांची ट्रेनिग आता
झाली अकरा महिन्यांची
दुष्मनावर ही वेळ येऊ नये
असे दिवस पाहण्याची
आधीच होता दुष्काळ
अन त्यात आला तेरावा
नशिबाचा फेरा असा
आमच्यावरच का फिरावा
डोळ्यात प्राण आणून चिली पिली
वाट पाहतात तिकडे
घालावे तरी कोणास
आमच्या वेदनांचे साकडे
कुठंवर पुरवायचा या
हिरमुसल्या मनाचा हट्ट
मन तर अजून थोडं
करावेच लागेल घट्ट
शेवटी पोलीस आहोत आपण
हे चालेल कसे विसरून
उंच भरारी घ्यायचीच आहे
जिद्दीचे पंख पसरून
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या