पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस पाल्य

इमेज
 *पोलीस पाल्य* पोलीस दलात आल्याची झाली एक वर्ष पूर्ण वर्दीसाठीच जगणं आमचं अन वर्दीसाठीच मरणं ज्यांच्यामुळे आम्हाला  मिळाली खाकी वर्दी त्यांच्या आठवणींचीच मनात कायम असते गर्दी जरी त्यांची आठवण मनात सारखी सलते वर्दी घातली की आमची छाती अभिमानाने फुलते पोलीस पाल्य म्हणून जरी आम्ही अभिमानाने मिरवतो त्यांच्या नसण्याचे दुःख ओल्या पापण्याआड जिरवतो संघर्षातूनच पुन्हा ही जिद्दीने  सुरवात आहे  पुन्हा नव्याने उजळणारी ही विझत्या दिव्याची वात आहे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

Passing out..

 *पासिंग आऊट वर पण मी*  एक सुरेख कविता लिहणार आहे त्यातील दोन  कडवी तर सुचली पण आहेत मला..☺️ नऊ महिन्याचा कस त्या एका दिवशी असतो तुम्हालाही कळेलच  पोलीस किती हौशी असतो खडतर प्रशिक्षणातूनच पोलीस घडत असतो खरा त्याग समर्पण बलिदानाची  तो जपेल पुढे परंपरा घामाचा थेंब अन थेंब  त्याने जिरवलाय मातीवर बापाचं नाव आयुष्यभर मिरवेल  तो अभिमानाने छातीवर ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

जबाब

इमेज
  जबाब मी फक्त बोलून जातो माझ्या मनात काही नसतं कागदावर आल्यावर मात्र सगळंच गणित फसतं कागदाला कागद अन जबावावर जबाब असतो अधिकाऱ्यांचा मात्र मग वेगळाच रुबाब असतो तू लिहून दे एकदा  असं होणार नाही पुन्हा चूक छोटीशीच असते हो पण वाटू लागतो गुन्हा तुला जे सांगितलंय  फक्त तेवढंच बोल इमानदारीला इथं काडीचं नसतं मोल जे चाललं होतं आधी तेच आपलं बरं होतं इथं खऱ्याचं खोटं अन खोट्याचं खरं होतं जिथं तत्वासाठी जेव्हा स्वाभिमान विकला जातो चूक कोणाचीही असो मग शेवटी अंमलदारच शेकला जातो ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

कविता नववर्षाची......

 *कविता नववर्षाची..* नवी उम्मीद नव्या जोशाने सुरवात कर कामाला कर्तृत्वाचा सुगंध येऊदे तुझ्या प्रत्येक घामाला सूर्याचे निस्सीम तेज अन पृथ्वीची असावी गती  तुझ्या प्रयत्नांची त्या संकटांनाच असावी भीती गरजेप्रमाणे माणसं येतील जवळ खूप मात्र वेळ आली की ते दाखवतील त्यांचं रूप आपलेच देतील दुःख हृदयास होतील यातना नववर्षाकडून घे तू  पुन्हा नवी चेतना अपमान होईल पदोपदी मात्र तू जाऊ नको खचून जिद्दीने दाखव त्यांना  इतिहास वेगळा रचून ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो: 8424043233