कविता नववर्षाची......

 *कविता नववर्षाची..*


नवी उम्मीद नव्या जोशाने

सुरवात कर कामाला

कर्तृत्वाचा सुगंध येऊदे

तुझ्या प्रत्येक घामाला


सूर्याचे निस्सीम तेज अन

पृथ्वीची असावी गती 

तुझ्या प्रयत्नांची त्या

संकटांनाच असावी भीती


गरजेप्रमाणे माणसं

येतील जवळ खूप

मात्र वेळ आली की ते

दाखवतील त्यांचं रूप


आपलेच देतील दुःख

हृदयास होतील यातना

नववर्षाकडून घे तू 

पुन्हा नवी चेतना


अपमान होईल पदोपदी

मात्र तू जाऊ नको खचून

जिद्दीने दाखव त्यांना 

इतिहास वेगळा रचून

✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो: 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत