Passing out..
*पासिंग आऊट वर पण मी*
एक सुरेख कविता लिहणार आहे
त्यातील दोन कडवी तर
सुचली पण आहेत मला..☺️
नऊ महिन्याचा कस
त्या एका दिवशी असतो
तुम्हालाही कळेलच
पोलीस किती हौशी असतो
खडतर प्रशिक्षणातूनच
पोलीस घडत असतो खरा
त्याग समर्पण बलिदानाची
तो जपेल पुढे परंपरा
घामाचा थेंब अन थेंब
त्याने जिरवलाय मातीवर
बापाचं नाव आयुष्यभर मिरवेल
तो अभिमानाने छातीवर
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या