पोलीस पाल्य


 *पोलीस पाल्य*

पोलीस दलात आल्याची
झाली एक वर्ष पूर्ण
वर्दीसाठीच जगणं आमचं
अन वर्दीसाठीच मरणं

ज्यांच्यामुळे आम्हाला 
मिळाली खाकी वर्दी
त्यांच्या आठवणींचीच मनात
कायम असते गर्दी

जरी त्यांची आठवण
मनात सारखी सलते
वर्दी घातली की आमची
छाती अभिमानाने फुलते

पोलीस पाल्य म्हणून जरी
आम्ही अभिमानाने मिरवतो
त्यांच्या नसण्याचे दुःख
ओल्या पापण्याआड जिरवतो

संघर्षातूनच पुन्हा ही
जिद्दीने  सुरवात आहे 
पुन्हा नव्याने उजळणारी ही
विझत्या दिव्याची वात आहे
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत