लता मंगेशकर


 

गानसम्राज्ञी ,गानकोकिळा

भारतरत्न लता मंगेशकर यांना 

भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐


*💐भावपूर्ण श्रद्धांजली💐*


काळाच्या पडद्याआड

विरून गेल्या लता

खरंच त्या आपल्यात

नाहीत का आता


गानसम्राज्ञी त्या 

गोड त्यांचा गळा होता

आबालवृद्धांपासून साऱ्यांना

त्यांच्या गाण्याचा लळा होता


रात्र गेलीच असेल सारी

ओल्या आसवात भिजून

त्यांचे स्वर कानात 

गुंजतायत ना अजून


पाषाण हृदयास ही

पाझर फुटायचा 

जेव्हा त्यांचा गोड कंठ

अश्रूसवे दाटायचा


काय लिहू काहीच कळेना

आत्ता या क्षणाला

त्यांचा जादुई आवाज

भुरळ घालायचा मनाला


आवाज अजरामर राहील

त्यांचा लाखो करोडो वर्ष

मात्र लाभणार नाही सुरांना

पुन्हा गानसम्राज्ञीचा स्पर्श

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत