Haapy Birthday

 *Happy Birthday aai*

आनंदाने भारून जाऊदे
आज आसमंत सारा
तुझ्या वाढदिवसाची आई
बघ ना तारीख आहे तेरा

कसा जागवावा मनात
तुझ्या वाढदिवसाचा हर्ष
लाभला नाही ना आज मला 
तुझ्या मायेचा परिसस्पर्श

ओलेचिंब भिजली असते
आई तुझ्या मायेच्या सरीत
मात्र इथवर आले बघ मी
हे विरहाचे दुःख पेरीत

तू ही डोळ्यात आता
आणू नकोस असावे
तुझ्या आठवणींचे हे
क्षण नाहीत गं फसवे

माझे मस्तक टेकावे तिथे
जिथे असतील तुझे पाय
उदंड आयुष्य लाभो तुला
आणखी बोलू तरी काय
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत