जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत  शिगाव ता.वाळवा येथील २३ वर्षीय जवान शहीद रोमित तानाजी चव्हाण यांना ही शब्दरूपी श्रद्धांजली..💐💐

*शहीद जवान रोमित चव्हाण अमर रहे...💐*

शिवजयंतीचा रंग जसजसा
शिवभक्तांच्या अंगी चढला
एक मावळा दहशतवाद्यांशी
अगदी प्राणपणाने लढला

निश्चय त्यांचा दृढ होता
जगावं कशासाठी
वारणेचा ढाण्या वाघ
शहीद झाला देशासाठी

तिरंग्यात लपेटून देह
पोहचेल वारणेकाठी
अमर रहे अमर रहे शब्द
असतील प्रत्येकाच्या ओठी

जीवनमरणाचं हे
नातं कसलं मातीशी
ती ही रडेल ढसाढसा
वर्दी धरून छातीशी

नुकतीच पार केली होती
त्याने वयाची विशी
तिच्या हंबरडयाचा आवाज
आज घुमेल दाही दिशी
✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत