Promise day
*🤝Happy Promise Day🤝*
तुम्ही पोहचा राजे गडावर
आम्ही गणिमांना भिडतो
अश्या वचनांचा आपल्याला
विसर का पडतो
आधी लगीन कोंढण्याचं
रायबाचं माझ्या मग
अशा वचनांची आपल्याला
लागते का कुठे धग
स्वप्नात दिलेलं वचन तो
सत्यात ही पाळतो
असा दानशूर हरिश्चंद्र
सांगा कुणास कळतो
अजून किती द्यावे सांगा
इतिहासाचे दाखले
प्राण त्यागुन स्वतःचे
वचन त्यांनी राखले
जिवलग नात्यांना आजकाल
हृदयात कुठे भाव असतो
शपथांचा बाजार अन
वचनांचा खोटा आव असतो
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या