पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रंग मैत्रीचा

*रंग मैत्रीचा*  रंग मैत्रीचा असा आज चढला आमच्या गालावर रोजच चालते परेड आमची एक दो एकच्या तालावर  ताल त्यांचा गाल आमचा मातीने असतो रंगलेला काळजात साठवावा क्षण तो मैत्रिणींसोबत जगलेला मौज मजा मस्ती त्याला बांध असतो शिस्तीचा आघाऊपनाला मात्र इथे रगडा असतो जास्तीचा जास्तीचा रगडा ही आम्ही झेलतो हसत खेळत कोण म्हणते इथं आपलेपण नाही मिळत आपलेपणाच्या रंगाला आठवणींचा गंध आहे सध्या तरी आमचा ट्रेनिंग हाच छंद आहे ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी Mo:- 8424043233
या कवितेतील पहिली चार कडवी मी 2009 साली लिहली होती पण ही कविता तेव्हापासून अपूर्णच होती तब्बल 13 वर्षानंतेर आज ही कविता मी पूर्ण केली आहे *नक्कीच आवडेल आपणास ही कविता......* *तुला म्हटलं होतं मी..* तुला म्हटलं होतं मी या प्रेमाच्या शर्यतीत मी ससा तू कासव आपलं प्रेम या कल्पनेत बसवं माहित नव्हती तुला प्रेमाची शर्यत म्हणूनच तुला फिरवून आणलं तिथपर्यंत तू बोललीस परत येताना खूप छान आहे हे स्वप्नांचे झाड येथे झोप लागते सुंदर आणि गाढ *After 13 years...* शर्यत सुरु झाली मी ही सुटलो सुसाट आयुष्यातील संकटाची तुडवीत प्रत्येक वाट त्या डेरेदार झाडाखाली मी घेतली थोडी विश्रांती हातात हात घेऊन म्हणालीस तूच हवास जीवनाच्या अंती मला नाही जिंकायची ही धावण्याची शर्यत फक्त तू सोबत रहा माझा श्वास असेपर्यंत मला सोबत घेऊनच तू आयुष्याची वाटचाल केली सुरु देत प्रेम एकमेकांना बघ आपणच अजिंक्य ठरु ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

Happy anniversary vaishali

इमेज
 वैशाली जायभाये यांच्या  लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहलेली ही सुरेख कविता आपणास ही  नक्कीच आवडेल...👍 *Happy anniversary* तुझ्यासोबत आयुष्याची ही पुन्हा सुरुवात झाली नवीन हृदयावर कोरले नाव तुझे आयुष्यभरासाठी प्रवीण छत्रीत आपण दोघे वरून सरी पावसाच्या पुन्हा ताज्या झाल्या बघ आठवणी त्या दिवसाच्या मळवट होता कपाळी अन हाती हिरवा चुडा भरलेला तुझ्या माझ्या प्रेमाचा तो अंतरपाट मध्ये धरलेला कसा दाखवू तुला राया तो क्षण श्वासात जपलेला अजूनही आठवतो तो चंद्र मुंडावळ्याआड लपलेला कसा झाला काहीच कळेना  हा एक वर्षाचा प्रवास देह जरी दोन असले तरी एकच आहे श्वास ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

लग्नाचा वाढदिवस

इमेज
  *लग्नाच्या 11 व्या वाढदिवशी लिहलेली अजून एक सुरेख  कविता खास रसिक मित्रांसाठी....* घाईगडबडीत विसरून गेलो आज लग्नाचा वाढदिवस चक्क तीच तर माझ्यासाठी आहे ना सुरेख असं माझं जग अख्ख उजाळा देताना पुन्हा जुन्या आठवनींना जरा तूच तर शिकवलास मला आयुष्याचा अर्थ खरा चिमणा चिमणीचा संसार हा दोन गोंडस लेकरांनी सजला अजून काय हवे होते सांग या छोट्याश्या जगात मजला कसा दाखवू प्रिये तुला तो क्षण श्वासात जपलेला अजूनही आठवतो तो चंद्र मुंडावळ्याआड लपलेला झाली अकरा वर्ष पूर्ण मान्य नाही अजून मनाला हृदयात कोरुन ठेवलंय बघ त्या रुपेरी स्वप्नवत क्षणाला तू सोबत असतीस तर फार बरं वाटलं असतं त्या दिवशीच ते स्वप्न आजही खरं वाटलं असतं दिल्याच पाहिजेत तरीही लाडके लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला आठवणींनीच्या झोक्यावरच झुलुदे आज  सखे आनंदाचा  झुला ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233