लग्नाचा वाढदिवस


 

*लग्नाच्या 11 व्या वाढदिवशी लिहलेली अजून एक सुरेख  कविता खास रसिक मित्रांसाठी....*

घाईगडबडीत विसरून गेलो
आज लग्नाचा वाढदिवस चक्क
तीच तर माझ्यासाठी आहे ना
सुरेख असं माझं जग अख्ख

उजाळा देताना पुन्हा
जुन्या आठवनींना जरा
तूच तर शिकवलास मला
आयुष्याचा अर्थ खरा

चिमणा चिमणीचा संसार हा
दोन गोंडस लेकरांनी सजला
अजून काय हवे होते सांग
या छोट्याश्या जगात मजला

कसा दाखवू प्रिये तुला
तो क्षण श्वासात जपलेला
अजूनही आठवतो तो चंद्र
मुंडावळ्याआड लपलेला

झाली अकरा वर्ष पूर्ण
मान्य नाही अजून मनाला
हृदयात कोरुन ठेवलंय बघ
त्या रुपेरी स्वप्नवत क्षणाला

तू सोबत असतीस तर
फार बरं वाटलं असतं
त्या दिवशीच ते स्वप्न
आजही खरं वाटलं असतं

दिल्याच पाहिजेत तरीही लाडके
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला
आठवणींनीच्या झोक्यावरच झुलुदे
आज  सखे आनंदाचा  झुला
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत