या कवितेतील पहिली चार कडवी मी 2009 साली लिहली होती पण ही कविता तेव्हापासून अपूर्णच होती तब्बल 13 वर्षानंतेर आज ही कविता मी पूर्ण केली आहे
*नक्कीच आवडेल आपणास ही कविता......*
*तुला म्हटलं होतं मी..*
तुला म्हटलं होतं मी
या प्रेमाच्या शर्यतीत
मी ससा तू कासव
आपलं प्रेम या
कल्पनेत बसवं
माहित नव्हती तुला
प्रेमाची शर्यत
म्हणूनच तुला फिरवून
आणलं तिथपर्यंत
तू बोललीस परत येताना
खूप छान आहे हे
स्वप्नांचे झाड
येथे झोप लागते
सुंदर आणि गाढ
*After 13 years...*
शर्यत सुरु झाली
मी ही सुटलो सुसाट
आयुष्यातील संकटाची
तुडवीत प्रत्येक वाट
त्या डेरेदार झाडाखाली
मी घेतली थोडी विश्रांती
हातात हात घेऊन म्हणालीस
तूच हवास जीवनाच्या अंती
मला नाही जिंकायची
ही धावण्याची शर्यत
फक्त तू सोबत रहा
माझा श्वास असेपर्यंत
मला सोबत घेऊनच तू
आयुष्याची वाटचाल केली सुरु
देत प्रेम एकमेकांना बघ
आपणच अजिंक्य ठरु
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
सेवानिवृत्ती समारंभ
सेवानिवृत्ती समारंभ लहानपणीच होती खरी शिक्षणाची मजा रे आमचे सर्वांचे लाडके असे सर रवींद्र हजारे इंग्रजी म्हटलं की अंगावर यायचा काटा आपणच खुल्या केल्या आम्हास भविष्याच्या असंख्य वाटा मुख्याध्यापक म्हणून आज तुम्ही होणार निवृत्त काळीज हलून गेलं सर ऐकून हे वृत्त आपलीशी वाटते अजूनही सर ही रयत शिक्षण संस्था अजूनही कमी झाली नाही अजून न्यू इंग्लिश स्कूल भोळीची आस्था तुमच्या शिक्षणरूपी वल्हयाने आयुष्याची वल्हवली होडी अजूनही आठवते आम्हास हातावरची निरगुडी छडी सारंच आठवतं सर पण बोलवत नाही आता बघा ना थोडा संथ झालाय हा हृदयाचा पाता पुष्पगुच्छ तुमच्या हाती अन टाळ्यांचा गडगडाट होईल बघा सर आता अश्रूंनाही कशी मोकळी वाट होईल पुढील आयुष्यास शुभेच्छा तुम्हास तुमचा प्रवास सुखाचा होवो तुम्ही घडवलेला विदयार्थी सर लाख मोलाचा होवो तुम्ही घडवलेला विदयार्थी सर लाख मोलाचा होवो अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 💐💐💐💐💐💐
टिप्पण्या