Happy anniversary vaishali
वैशाली जायभाये यांच्या
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहलेली ही
सुरेख कविता आपणास ही
नक्कीच आवडेल...👍
*Happy anniversary*
तुझ्यासोबत आयुष्याची ही
पुन्हा सुरुवात झाली नवीन
हृदयावर कोरले नाव तुझे
आयुष्यभरासाठी प्रवीण
छत्रीत आपण दोघे
वरून सरी पावसाच्या
पुन्हा ताज्या झाल्या बघ
आठवणी त्या दिवसाच्या
मळवट होता कपाळी अन
हाती हिरवा चुडा भरलेला
तुझ्या माझ्या प्रेमाचा तो
अंतरपाट मध्ये धरलेला
कसा दाखवू तुला राया
तो क्षण श्वासात जपलेला
अजूनही आठवतो तो चंद्र
मुंडावळ्याआड लपलेला
कसा झाला काहीच कळेना
हा एक वर्षाचा प्रवास
देह जरी दोन असले तरी
एकच आहे श्वास
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या