*एक दिवस माझ्या कवितांना..* एक दिवस माझ्या कवितांना असेल सोनेरी मुखवटा सप्तरंगांनी नटलेल्या सुंदर नाजूक छटा एक दिवस माझी कविता असेल प्रत्येकाच्या ओठी कधी चंद्राच्या तर कधी असेल तारकांच्या पाठी एक दिवस माझ्या कविता बसतील प्रत्येकाच्या मनात आपल्याशा वाटतील त्यांना हरवलेल्या उदास क्षणात एक दिवस माझ्या कवितांना मिळेल हक्काचं घरकुल त्यांना जिवंतपण देणं हेच माझं पुढचं पाऊल एक दिवस माझ्या कवीतांचे असतील पुस्तकांचे थवे मिळेल त्यांना एक अनोखे रूप नवे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233