स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🇮🇳*
*🇮🇳घरोघरी तिरंगा...🇮🇳*
साऱ्या भारतीयांसाठी हा
जणू एक उत्सव
साजरा करू आनंदाने
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव
स्वातंत्र्यासाठी त्यांनी
लावली जीवाची बाजी
थेंब थेंब रक्त गाळून
त्याची शान वाढवतोय फौजी
राष्ट्रप्रेम हृदयातून
जाऊदे थोडं उतू
मनामनात बांधू
एकात्मतेचा सेतू
अभिमानाने फडकेल
तिरंगा प्रत्येक दारी
हीच त्यांच्या बलिदानाला
सलामी आहे खरी
तिरंग्याच्या सन्मानार्थ
पर्वा नको कशाची
घरोघरी तिरंगा फडकवून
शान वाढवू देशाची
✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
टिप्पण्या