जागतिक वडापाव दिन..


 #जागतिक_वडापाव_दिवस 


खमंग असा सुवास त्याचा 
भुरळ घालायचा मनाला
आठवण येतच असेल त्याची
अगदी आत्ता या क्षणाला 

वडिलांनी दिलेले पैसे 
ठेवायचो आम्ही जपून
भूक लागली की वडापाव
मग हळूच खायचो लपून

वडापावचा स्वाद दिवसभर
रेंगाळायचा जिभेवर
बहिष्कार टाकावा तरी कसा
सांगा मित्रांच्या सभेवर

गरमागरम वडापाव सोबत
मिरच्या हव्यातच तळलेल्या
आठवतात पुन्हा पुन्हा त्या
मैत्रीच्या गाठी जुळलेल्या 

 एकटाच असतो आता
हातात वडापाव धरून
कॉलेजचे ते दिवस पुन्हा
सांगा येतील का फिरून
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खुप छान सर


Unknown म्हणाले…
खूप छान सर👌👌👌
Sharad Randive म्हणाले…
खुप छान सर चारोळी👌👌👌

Avinash Madane म्हणाले…
खूपच छान..👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत