लवकर घरी या

 काल सहज बसलो होतो आणि आपसूकच ही कविता सुचली बरेच दिवस झालं माझ्या हातून नवीन काही व त्या ताकदीच पुन्हा लिहलं गेलं नाही पुन्हा लेखणीस बळ मिळावे शब्दांना धार यावी माझी कला पुन्हा त्याच जोमाने व ताकदीने फुलावी हीच प्रामाणिक इच्छा आहे

*नक्कीच आवडेल आपनास ही रचना.....*


ढगांच्या कडकडाटासह

चमकत आहेत विजाही

त्यांनाही जाणवत असावा

सखे विरह तुझाही


पावसाच्या धारांसोबत

ओल्या डोळ्यांच्या कडाही

त्याने ही उचलला असावा

आपल्या मिलनाचा विडा ही


धावत्या पाण्यासोबत

हे मनही लागतं धावू

त्यांच्याप्रमाणेच आपण

एकमेकांचे कधी होऊ


साक्षीला आहेत बघ

श्रावणाच्या सरी या

आठवतात शब्द तुझे ते 

साहेब लवकर घरी या

✍️✍️✍️✍️✍️✍️

PSI अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत