प्रीतीचं मोहोळ
28/08/2010 शनिवार रोजी
लिहलेली ही सुरेख अशी कविता
नक्कीच आपणास आवडेल
*या कवितेवरून आपणास*
*दर्दी कवीच्या कल्पनाशक्तीचा*
*अंदाज नक्कीच येईल मित्रांनो..*
*प्रीतीचं मोहोळ*
मनाच्या फांदीवर जेव्हा
बसतं प्रीतीचं मोहोळ
तेव्हा सुचली अचानक
मला कवितेची ही ओळ
हर एक उडणारी आशा
मनातील विश्वास करते गोळा
पोळ्यास जीव लावणाऱ्या
फांदीचा स्वभाव मात्र भोळा
फांदीपासून अलग जर
कधी केले कोणी पोळे
सुजल्याशिवाय राहणार नाहीत
मग त्याचे दोन्ही डोळे
फांदीच्या कानात मधमाशा
गुणगुणतात प्रीतीचं गीत
असेही ते दोघे कधी
कुणासच नाहीत भीत
आयुष्यभर फांदी पोळ्यातील
कशी चाखू शकेल मध
एक दिवस झालाच शेवटी
त्यांच्या निस्सीम प्रेमाचा वध
उडून गेल्या मधमाशा तरी
पोळं तसंच फांदीला चिटकून
मध नसलेल्या क्षणात ही
त्यांचं प्रेम मात्र तसंच टिकून
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
टिप्पण्या