बाराखडी

 2010 साली लिहलेली मात्र अजूनपर्यंत कुठेच प्रदर्शीत न केलेली कविता नक्कीच आपणास आवडेल


*बाराखडी*


अक्षरांची मला  फार

गंमत वाटते

माझ्या मनाशी त्यांचे

संगनमत वाटते

 

कधी उगारावी

प्रेमाने त्यांच्यावर छडी

तेव्हा बोलावी वाटते

मला बाराखडी


कधी येतात अक्षरे

मनाच्या किनाऱ्यावर

उकारांच्या बोटी वल्हवत 


कधी अक्षरे भासतात

पहारा देणाऱ्या सैनिकाप्रमाणे

मात्रांची तलवार खांद्यावर घेतल्याप्रमाणे


कधी भासतात ते

पिसारा फुलविलेल्या मोराप्रमाणे

मात्राचे तुरे डोक्यावर असणारे


तर कधी भासतात ती

खऱ्या मित्राप्रमाणे

हातात हात घेऊन

एकमेकांना सावरणारी


कधी अक्षरे भासतात

वेलांटीच्या टोप्या घालून

विदुषकाप्रमाणे हसवणारी



तर कधी अक्षरे भासतात

कमरेवर हात ठेऊन

आपल्यालाच दरडावणारी


तर कधी अक्षरे भासतात

कपाळावर कुंकू लावलेल्या

नव्या नवरीसारखी


कधी अक्षरे भासतात

काना चा दरवाजा लावून

गुपचूप शांत बसलेली

✍️✍️✍️✍️✍️✍️

PSI अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत