सिंधुताई सकपाळ
*अनाथांची माय....*
मनी ध्यानी नसतानाही
अशी घडून गेली घटना
काय केलं तरी मनास
अजून पण खरं वाटंना
अनाथांची माय म्हणे
सोडून गेली लेकरास
कोण देईन मायेची उब
निराधार अनाथ पाखरास
फक्त अनाथांचीच नाही तर
ती माऊली होती विश्वाची
अश्रुतच मोजली जाते इथे
किंमत अखेरच्या श्वासाची
जीवनसंघर्ष त्यांचा ऐकून
अक्षरशः अंगावर येतो काटा
मनास धडकतात फक्त आता
त्यांच्या स्मृतीच्यांच लाटा
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या