*जी होती मनात..* जी मनात होती मित्रांनो नेमकी तीच नाही मिळाली माझी साधी भोळी प्रीत तिला कधीच नाही कळाली तीच मनमोहक रूप डोळ्यांना घालायचं भुरळ ती अल्लड नखरेवाली माझा स्वभाव मात्र सरळ डोळ्यात साठवायचो रोज तीचं देखणं रूप जिवापेक्षा ही जास्त ती आवडतं होती खूप ती मिळावी म्हणून मी काय काय नाही केलं आयत्या वेळी मात्र होत्याचं नव्हतं झालं मनात असूनही ती दुसरी सोबत संसार थाटला तुम्हीच सांगा मित्रांनो तुम्हाला दर्दी कवी खरच असा वाटला काळेकुट्ट केस तिचे अन लाल तिची साडी होती दुसरं तिसरं कोणी नाही मित्रांनो मला आवडलेली ती एक गाडी होती ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233
साथ तू देशील का...? नुसतीच रंगवतो स्वप्ने पूर्ण ती होतील का रंगून जाण्यास स्वप्नात साथ तू देशील का तुझ्याशिवाय नाहीच पाहिलं कुठलं स्वप्न तुझही आहे काम ते नयनात तसंच जपणं प्रत्येक स्वप्नपूर्तीची आता आस मनी आहे या भुकेलेल्या मुखातील घास कुणी आहे स्वप्नही असे काय जगावेगळे नाही तुझे माझेच ते संसारावेगळे नाही ✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233
*आज शब्दांनीच मला प्रश्न केला* *नक्किच आवडेल आपणास* *माझी ही कविता...* शब्दांनीच आज मला असा केला प्रश्न गप्प बसून असं अवसान आणू नको उसणं कुठे हरवल्या सांग तूझ्या रोजच्या कविता चारोळ्या आतूनच येऊ लागल्या माझ्या मनाच्या आरोळ्या आधी तर म्हणे तू रोज न चुकता पाठवायचा आमच्यासाठी तू स्वतःच रक्त ही आटवायचा तू तर बोलत होता म्हणे शब्दच माझ्यावर रुसले आपल्या दोघांमध्ये सांग हे वैर असले कसले आम्हीच तर शिकवली तुला कवितेची भाषा अन आजकाल तर तू पार सोडूनच दिलीस अशा अरे तू फक्त आम्हाला एकदा गोंजार प्रेमाने शिळामुक्त केले होते जसे माता अहिल्येला रामाने लाडीवाळपणे आम्हाला जवळ तर घे कुरवाळून आम्हीही तुझ्यावर बघ कसा टाकतो जीव ओवाळून आज जे काही अस्तित्व आहे ते आमच्यामुळेच आहे तुझे समजू नको आम्हाला तू तुझ्या मनावरचे ओझे ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233
टिप्पण्या