ऑफिस काम....


ऑफिस काम


ऑफिसला जायची

 तिची असते लगबग

तिचाही संघर्ष तू

जरा जवळून बघ


ती उठते सकाळी

आवरते सारे घर

तिच्या त्यागाची

येईल कोणास सर


तिला ही प्रिय असतात  

मुलं बाळं घरदार

तरीही संकटापुढे ती

कधी मानत नाही हार 


संसार आणि कर्तव्य

दोन्हीही लिलया पेलते

पुरुषासोबत काम करून

स्वाभिमानाने चालते


दिवसभर कितीही थकली तरी

स्वयंपाक भांडी चुकतं नाही

ती ही खूप जिद्दी असते

परिस्थितीपुढे झुकत नाही


एवढं सगळं करूनही

गाठीशी तिच्या इमान आहे

म्हणूनच तिच्या या कर्तव्यास

माझाही प्रणाम आहे

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

PSI अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो:- 8424043233


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत