सत्र क्रमांक 32

 *सत्र क्रमांक 32*

(2005 ची बॅच) 


अठरा वर्षाच्या नोकरीत

वाढवली वर्दीची शान 

चारचौघात तिला

वेगळाच आहे मान


वर्दी चढली अंगावर

ती तारीख होती सतरा 

त्या वर्दीसाठीचा संघर्ष 

तुला काय सांगू मित्रा 


हुल्लड मनाचा मी

असा झालो वर्दीधारी

तिच्या स्पर्शाने माझी

बदलली दुनिया सारी


हा हा म्हणता नोकरीची

पूर्ण झाली अठरा वर्ष

अजूनही नाही वर्दीस कुठे 

गालबोटाचा मलीन स्पर्श


निष्कलंक सेवेची आज

झाली अठरा वर्ष पूर्ण

वर्दीसाठीच जगणं आमचं

अन वर्दीसाठीच मरणं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत