विहिरीवरचे पाणी....


 विहिरीवरचे पाणी

आत्ता कुठे आले
घरोघरी नळ
नाहीतर हंडा घे अन
विहरीवर पळ

तांब्या पितळीचा हंडा 
चकाचक घासायचा
इतका सुरेख तो
प्रत्येक दिवस असायचा

हंड्यावर हंडे असे 
डोक्यावर असायचे तीन
कमरेभोवती वरून
कळशीची सुरेख वीण 

दोन्ही हातात भरलेल्या
बादल्या असायच्या दोन
आत्ताच्या काळात असली
कसरत करतं कोण

कधी रस्सी तुटायची तर
कधी बादली बुडायची
भरताना पिण्याच पाणी
सगळी तारांबळ उडायची

गावच्या गोड आठवणींचा 
कसा पडेल विसर 
असं हे गावचं जीवन
शहरात मात्र झालं धुसर
✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233

टिप्पण्या

युवराज tele म्हणाले…
काय होते ते दिवस
आठवणीतले ते दिवस आठवले बघ परत
कवितेत तुझ्या भेटले
प्रत्यक्षात येणार जरी नसले परत 🙏👍
छान कविता आहे त्यातील डोक्यावर तीन हंडे आणि कमरेवर कळशी
आणि त्याला दिलेली विन ची उपमा खुप सुंदर आहे 👌
Avinash Madane म्हणाले…
खूपच छान..��

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत