प्रिय पत्नीस...
प्रिय पत्नीस....
पंधरा वर्षाचा सखे हा
किती खडतर प्रवास सारा
आसुसलेल्या जीवास माझ्या
तुझ्या कुशीत मिळेना थारा
लग्नाचे वाढदिवस कुठे सांग
असतात पोलिसांच्या नशिबी
सहवासाचे क्षण तेवढे सखे
ठेव तू आपल्या हिशोबी
सण उत्सवात पोलिसांची
अवस्था खूपच असते गंभीर
पोलीस पत्नी आहेस तू
मन अजून कर खंबीर
सवय झालीच असेल तशी तुला
या पोलीस नोकरीची माझ्या
हीच खरी कसोटी म्हणत
करू लग्नाच्या आठवणी ताज्या
वाटणं साहजिकच आहे
या क्षणी सोबत मी असावे
शुभेच्छा स्वीकारत माझ्या
नकळत गाली तू हसावे
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या